पो. डा. गुन्हे वार्ताहर , जिग्नेश जेठवा, नाशिक : नाशिक शहरात वारंवार घडणारे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी स्वतः सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली शाखा युनिट एकचे पथक घरफोडी करणाऱ्या आरोपी त्यांची माहिती काढून शोध घेत होते. दिनांक 25 जून 2023 रोजी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना अंमलदार राजेश राठोड यांना घरफोडी चोरी करणारा इसम बिटको चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून बिटको नाशिक रोड येथे सापळा लावून संशयित इसम अखिल उर्फ अनिल सुरेश चव्हाण ,व 29 ,राहणार , मुक्तिधाम , नाशिक रोड, नाशिक या शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले त्या सखोल विचारपूस करता त्याने मुंबई नाका येथील कल्पतरू नगर व आडगाव येथील श्रीराम नगर येथे घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे कडून बारा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या लगड किंमत रुपये साठ हजार च्या हस्तगत करण्यात आल्या. आरोपीताने केलेल्या घरफोडी चोरी संबंधी मुंबई नाका पोलीस ठाणे कडील गुरन 69/ 2023 भादवि कलम 454, 457, 380 व आडगाव पोलीस ठाणे कडील 104/ 2023 भादवि कलम 454 , 380 प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहे. सदर आरोपीतास पुढील तपास व कारवाईकामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे मुंबई नाका पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे ,श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे , माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वसंत मोरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ ,सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत , विष्णू उगले , पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे , नाजिम पठाण , धनंजय शिंदे, विशाल देवरे , विशाल काठे, महेश साळुंखे, राजेश राठोड , मुक्तार शेख , आप्पा पानवळ, अण्णासाहेब गुंजाळ यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.