Author: Police Diary

विधानसभा निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला समर्पित आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांप्रती व्यक्त केली कृतज्ञता निवडणुकीतील विजयानिमित्त घुग्घुस येथे भव्य नागरी सत्कार पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, चंद्रपूर – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी २६ हजार मतांनी विजयी झालो. विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही माझी सातवी वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी चार आमदार असे आहेत जे आठवेळा निवडून आले आहेत. आणि तीन आमदार असे आहेत जे सातवेळा विजयी झाले आहेत. त्यातला मी देखील एक आहे. पण हे यश माझे नाही, माझ्या कार्यकर्त्यांचे आहे. कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. ते आमच्यापेक्षा जास्त काम करतात. घरावर तुळशीपत्र ठेवून…

Loading

Read More

नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, बुलडाणा, : मकर संक्रांतीच्या अगोदर व नंतर काही दिवस पतंग उडविण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी नायलॉन मांजा (दोरा) या धाग्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच या मांजामुळे मानवी जीवितास, पशु-पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जखमी व मृत होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण अधिनियमानुसार संपूर्ण जिल्ह्यात नायलॉन मांजाचा वापर, विक्री व निर्मिती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणुकदार यांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणुक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस…

Loading

Read More

बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जळगाव, : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. ही बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त १ रूपयात होत असतानाही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजेंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणूक प्रकरणाला आला बसावा यासाठी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे…

Loading

Read More

वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन : 31 मार्चपर्यंत मुदत पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, अमरावती, : केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार वाहनधारकांनी 31 मार्च पूर्वी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी एजंसी निश्चित करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बुकींग करण्यासाठी mhhsrp.com पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकींग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसवून घेण्यात यावी. वाहनधारक अमरावती कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी अमरावतीमध्ये वाहन वापरत असल्यास वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक…

Loading

Read More

माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, बुलडाणा, : माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांनी काही कारणास्तव प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनाचे (PMSS) फॉर्म वेळेवर भरले नाही, अशा सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी, युद्ध विधवा यांच्यासाठी अर्ज सादर करण्याची लिंक दि. 30 डिसेंबर 2024 ते दि. 3 जानेवारी 2025 पर्यंत पुन्हा उघडण्यात येत आहे. तरी माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रूपाली पांडूरंग सरोदे यांनी केला आहे.

Loading

Read More

सुपर स्पेशालीटीतील शिबिरात 55 जणांचे रक्तदान पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, अमरावती, : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे 27 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबीरात 55 जणांनी रक्तदान केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांनी शिबिराचे आयोजन केले. शिबिरामध्ये रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि खासगी वैद्यकीय संस्थेतील विद्यार्थी, विदर्भ आयुर्वेद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना विभाग प्रमुख डॉ. श्याम गावंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, परिसेविका अलका जवंजाळ, वैद्यकीय समुपदेशक दिनेश हिवराळे, मुकादम श्रीकांत ढेंगे, विक्रांत येते यांनी सहकार्य केले.…

Loading

Read More

भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, बुलडाणा : भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांना शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.…

Loading

Read More

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ऍक्शन मोड वर पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत असून विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत आगामी 100 दिवसात करावयाचे उपक्रम, योजना, प्रकल्प, कार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यात एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रभर लागू करणे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा पुनर्विकास करून उद्घाटन सोहळा आयोजित करणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रकाशन सोहळा आयोजन करणे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा अशा विविध विषयांसंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री…

Loading

Read More

खाजगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासना’चे नाव, पाटी किंवा स्टीकर लावल्यास होणार कारवाई; सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारींची माहिती पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जळगाव: महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहून व आतील भागात महाराष्ट्र शासन, नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली आहे. जर अशा प्रकारची वाहने ज्यावर महाराष्ट्र शासन नाव, लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टीकर चिकटवून वाहने रस्त्यावर फिरतांना आढळून आली तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. खाजगी वाहनांवर किंवा वाहनांत महाराष्ट्र शासन अशा पाटी किंवा बोध चिन्हाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियन व त्याअंतर्गत नियमानुसार कारवाई…

Loading

Read More

शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा: आयुक्त, महानगरपालिका, मालेगाव पोलीस डायरी प्रतिनिधी, सुरेश पाटील, मालेगाव; मालेगाव महानगरपालिके मार्फत शहरातील सर्व नागरीकांना जाहीर निवेदन करण्यात येते की, दि.०४/१२/२०२४ रोजी शहरात प्रायोगित तत्वावर एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु एक दिवसआड पाणी पुरवठा करणेसाठी २४ तास गिरणा पंम्पिंग सुरु ठेवावी लागत आहे. शहरातील वाढलेली झोन्सची संख्या व त्यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत पाणी पुरवठा होत असल्याने व सद्या हिवाळ्याचे दिवस असल्याने शहरातील नागरीकांच्या मागणी नुसार व मालेगाव महानगर पालिके मार्फत प्रगती पथावर असलेली अमृत योजनेतील उंच जलकुंभांचे व इतर आवश्यक कामे पुर्ण होईपावेतो…

Loading

Read More