पो. डा. वार्ताहर , वाशिम : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे. 1 जून 2023 ते 20 जुलै 2023 पर्यंत मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच नवितम आयटी ॲप्लीकेशन आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/ मतदान केंद्रस्तरीय यांना प्रशिक्षण. 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या वतीने प्रत्यक्ष घरोघरी भेट देवून पडताळणी. 22 ऑगस्ट 2023 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी/मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन यादीत सुधारणा करणे तसेच अस्पष्ट/ अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंतधित मतदाराकडून योग्य दर्जाची छयाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करुन मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे आणि कंट्रोल टेबल अद्यावत करणे.
30 सप्टेंबर 2023 ते 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत नमुना 1-8 तयार करणे आणि 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करणे. 17 ऑक्टोबर 2023 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे. 17 ऑक्टोबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी. यासाठी विशेष मोहिम दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार राहील.
26 डिसेंबर 2023 रोजी दावे व हरकती निकालात काढणे. 1 जानेवारी 2024 पर्यंत अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे आणि 5 जानेवारी 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या अधिनस्त मतदार नोंदणीसाठी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून नवीन मतदार नोंदणी व व्हीएचए/एनव्हीएसपी/ ओटर हेल्पलाईन व गरुडा ॲपव्दारे माहिती गोळा करणे व ऑनलाईन नाव नोंदणी करणे याबाबत उपक्रम राबविण्यात येणार आहे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक नमुनेही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजश्री कोरे यांनी कळविले आहे.