जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 20 टक्के सेस फंडातून साहित्याचे वाटप
पोलीस डायरी, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 20 टक्के सेस फंड योजनेंतर्गत सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी मागासवर्गीय शेतकरी, मागासवर्गीय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीस 100 टक्के अनुदानावर साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
या योजनेतून 5 एचपी विद्युत मोटार पंप, एचडीपीई पाईप, मागासवर्गीय महिलांकरीता शिलाई मशिन पुरविण्याची योजना घेण्यात आली होती. सदर योजनेचे ज्या लाभार्थ्यांनी अर्ज पंचायत समितीमार्फत समाज कल्याण विभागाकडे केले आहेत, अशा पात्र लाभार्थ्यांची निवड यादी पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर लाभार्थ्यांनी आपली देयके पंचायत समितीमध्ये तात्काळ सादर करावे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आवाहन मनोज मेरत यांनी केले आहे.