पो.डा. वार्ताहर : बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाची लुटमार करणारा आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर ची कामगिरी दिनांक 27 जुलै 2023 रोजी रात्री आठ वाजता चे सुमारस फिर्यादी शिवाजी बापूराव पवार, वय ४५ वर्षे, राहणार पवार निवास बालाजी नगर, जेलर रोड, नाशिक यांचा चोरडिया सदन महात्मा गांधी रोड नाशिक रोड येथे ऑनलाइन पैसे पाठविण्याचा व्यवसाय असून ते दुकान बंद करून निघत असताना अनोळखी इसमाने दवाखान्यात अर्जंट पैसे पाठवायचे आहे असे सांगितले. फिर्यादी यांनी रोख पैसे नसल्याची ऑनलाईन पैसे पाठवण्याचे काम बंद केल्याचे सांगितले तेव्हा अनोळखी इसमाने बहाणा करून कार मध्ये बसा माझ्याकडे रोख रक्कम आहे तुम्ही तुमची गाडी उघडा मी तुम्हाला गाडीत पैसे मोजून देतो असे सांगून दोघे कार मध्ये बसल्यानंतर फिर्यादी यांना पिस्तोल सारखे हत्यार दाखवून मी सांगेल तशी चालवायची नाहीतर तुला मारून टाकेल अशी धमकी देऊन कार दारणा हॉटेल कडे घेण्यास सांगून फिर्यादीचे गळ्यातील चेन मोबाईल रोख रुपये व एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे पैसे काढून रुपये 97 हजार बळजबरीने करून चोरून नेला होता. त्यावरून नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हा गुर नंबर 362 / 2023 भा.द.वी. कलम ३९२, ३६३, ५०६, गुन्हा दाखल करण्यात आला होता. माननीय पोलीस आयुक्त सो नाशिक शहर यांना सदरचा गुन्हा गुन्हे शाखेने उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे हे नाशिक शहर व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी मार्गदर्शन केले होते. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट नंबर एकचे अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असताना दिनांक 30 जुलै 2023 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळवली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा शहापूर तालुक्यातील जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अज विजय ढमळ असो यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार संदीप भांड, पोलीस नाईक महेश साळुंखे, विशाल काठे, राजेश राठोड व चालक सह सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ अशांना सदर ठिकाणी रवाना करून सदर पथकाने खरीवली नमन पाडा पोस्ट आवळे, तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी जाऊन तपासाचे कौशल्य वापरून इसम नामे किरण परशुराम गोरे, वय २४ वर्षे, राहणार बामणे पोस्टवर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एअरगन, एस एस बी आय बँकेचे व ॲक्सिस बँकेचे डेबिट कार्ड, फिर्यादी यांच्याजबुरीने चोरलेला मोबाईल फोन व इतर दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करून सदर आरोपीतास पुढील तपास व कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. मुंबई नाका पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत सदरची कामगिरी माननीय श्री अंकुश शिंदे पोलीस आयुक्त, नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे हे नाशिक शहर माननीय डॉक्टर सिताराम कोल्हे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट नंबर एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ सहाय्यक, पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस अंमलदार संदीप भांड, महेश साळुंखे, विशाल काटे, राजेश राठोड व चालक सपोउनि किरण शिरसाठ अशांनी संयुक्तरीत्या केली आहे.