पो.डा. वार्ताहर : राज्यात या वर्षी कमी पर्जन्यात झाल्याने सर्वत्र पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिना सुरु झाला असून लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत.अर्थात उष्णतेचा चटका हा नागरिकांना बसणार असून निवडणूकीचा फटका कुणाला बसतो तो निवडणूका संपल्यावरच कळेल. धुळे जिल्हयात देखील पाणी टंचाईचे वारे वाहू लागले असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
राज्यात या खरीप हगांमात ज्या प्रमाणात पाऊस व्हायला हवा होता त्या प्रमाणात झाला नाही. राज्यातील धरणांमध्ये आवश्यक असलेला जलसाठ जमा न झाल्याने वृत्त प्रसारमाध्यमांनी या अधीच दिले होते. मराठावाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस न झाल्याने मार्च महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. राज्यात पाऊस कमी आणि वादळे, गारपीट अशा प्रकारचा शेतीस नूकसान करणारा पाऊस झाला. तोसुध्दा काही भागात पडला तर काही भागात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे मध्यम- लघु प्रकल्प क्षमतेने पूर्ण भरले गेलेच नाहीत. राज्यात ट्रीपल इंजिन सरकार हे केवळ बोलण्यासाठी आणि भाषणासाठीच आहे. परंतू ट्रीपल इंजिनने जे पाणी निघायला हवे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे. कारण फोडाफोंडीच्या राजकारणात राज्यात विज टंचाईवर कधीही चर्चा झाली नाही, शेतकर्यांना दिवसा विज न देता रात्री विज दिली गेली. ती सुध्दा आठवडयातून तीन दिवस, दिवसा शेतकर्याने शेतात काम करायचे आणि रात्री विज आहे म्हणून शेतातील पिंकांना पाणी भरण्यासाठी जायचे हे शोकांतिका राज्यकर्त्यांना कळालीच नाही. परंतू शेतकर्याच्या बांधावर गेलो हे भाषणांमधून सांगताना राज्यकर्त्यांना काहीच वाटत नाही. धरणामध्ये पाण्याचा साठा कमी असतांना फे्रबुवारी महिन्यापासूनच 15 मार्च ते 15 जून पर्यन्त या तीन महिन्यासाठीचे पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची सुध्दा आहे. परंतू जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ‘हर घर नल, हर नलमें जल’ अशा घोषणा करण्यात येतात. जाहिराती दिल्या जातात परंतू त्या हर घर नळातून जलच येत नसेल तर त्या तोटीकडे नुस्तेच बघायचे का? अशा संतप्त जनभावना मार्च महिन्यातच निर्माण झाल्या आहेत. धुळे जिल्हा परिषद याला अपवाद नाही. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यात आता पासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील तीन गांवामध्ये टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून या महिना अखेर 15-ते 20 गांवाना टॅकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची दाट शक्यता आहे. ज्या ज्या गावांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यांनी तहसीलदारांना व पंचायत समिती ग्रामीण पुरवठा विभागाकडे अर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. या शिवाय शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी मेथी, सुराय, टेभंलाय, महाळपूर, परसामळ, चिमठाणे, मालपूर,अलाणे, वायपूर, दलवाडे आरावे सारख्या 41 गांवामध्ये विहीरी अधिग्रहीत करुन पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. शेतातील विहीरी अधिग्रहित केल्याने शेतात विजपुरवठा हा रात्री बेरात्री केव्हाही बंद केला जातो त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात देखील अडचणी निर्माण होत आहेत. आजच्या परिस्थितीत 41 गांवातील विहीरी अधिगृहीत केल्या असल्यातरी ही संख्या 60 ते 70 गांवापर्यंन्त जावू शकते. नरडाणा, वारुड, विटाई,कर्ले, महाळपूर, दत्ताणे,वरुळ-घुसरे सारख्या गांवाना देखील पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या बरोबरच साक्री तालुक्यातील लाठीपाडयाचे पाणी उजव्या – कालव्यात सोडण्याची मागणी साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हाधिकारी धुळे यांनी केली आहे. त्यामुळे साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणातून छाईल, प्रतापपूर दिघावे, गणेशपूर, नाडसे, दारखेल, बेहेड, निमगव्हाण या गांवासाठी पिण्याच्या आरक्षीत केलेल्या पाण्यातून शंभर दशलक्ष घनफुट पाणी उजच्या कालव्याद्वारे सोडण्यात येणार आहे. यातील काही गांवामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थात दोन-तीन किलोमीटर वरुन लांब अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. शिरपूर तालुक्यात संभाव्य पाणी टंचाईच्या सामना करण्यासाठी आ. काशिराम पावरा आणि आ अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील पाडयाच्या गावात 35 टॅकरचे वाटप नुकतेच केले आहे. धुळे तालुक्यातून सुध्दा काही गांवामधुन तक्रारी यायला सुरुवात झाली असून अक्कपाडा धरणातून 8 आवर्तन सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडून करण्यात येईल अशी शक्यता आहे. धुळे शहरातून अद्याप पाणी टंचाईची ओरड निर्माण झाली नसली तरी मनपा प्रशासनाने तापी पाणी पुरवठा योजनेवरील लिकेजेस बंद केल्याने या महिन्यात पाणी टचांई निर्माण होईल अशी स्थिती आजतरी नाही. मात्र दररोज तापमानात वाढ होत असल्याने विहीरी आणि कुपनलीकांची पाण्याची पातळी खालावत जाते आहे. अजून तीन महिने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करणाचे आवाहन प्रशासन आणि राज्यकर्त्यांना आहे पोटभर मुबलक पाणी मिळेल अशी ‘गॅरटी’ अजून सरकारने दिलेली नाही. शेतकर्यांना पूर्णवेळ विज देणारे सरकार जन्माला यायचे आहे. त्यामुळे कुणाच्याही ‘गँरटी’ वर विश्वास ठेवण्याचे काही कारण नसावे असे आमच्या समाजवादी मित्राला वाटते. एक मात्र नक्की की धुळे जिल्हयात पाणी टंचाईचे वारे पाहू लागण्याने जिल्हा प्रशासन अलर्टमोडवर आलेले आहे. नागरिकांनी देखील या विज महिन्यात पाण्याच्या काटकसरीने वापर करावा. बाशी पाणी म्हणून ते सर्व पाणी फेकून देण्याची पध्दत बंद करावी. पाणी जपून वापरावे जेणे करुन आपल्या इतर बांधवांना पाणी टंचाईची झळ पोहचणार नाही. केवळ पाणी मिळावे यासाठी ओरड न करता पाण्याची बचत कशी करता येईल यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांनी आजपासूनच पाण्याचा जपून वापर करावा. असे दैनिक पोलीस शोधच्या व्यासपिठावरुन आम्ही नागरिकांना नम्र निवेदन करीत आहोत.तुर्तास एव्हढेच.