घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पोलीस डायरी जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या घाटंजी येथील पहिल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी बेले यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भव्य रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.
रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि बेले यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. बेले यांनी रॅलीमध्ये बोलताना सांगितले की, ते निवडून आल्यास वंचित आणि गरीब घटकांच्या हिताचे काम करतील.
त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याचे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचे वचन दिले.
या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश बेले यांच्या या रॅलीमुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणनीती आता रंगत आली आहे. घाटंजी, मुकुटबन, पांढरकवडा आणि वणी या भागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांप्रती नागरिकांमध्ये अत्यंत उत्साह पसरला असून, प्रचंड बहुमताने विजय करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.