सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जागेवर निवड संधी : सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे
पोलीस डायरी, प्रतिनिधी परभणी: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला, परभणी यांच्या विद्यमानाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी मेळाव्यामध्ये उद्योजक, तंत्र प्रशाला नारायण चाळ स्टेडीयम परिसर परभणी येथे बुधवार दि.13 रोजी जागेवर – निवडसंधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत Just Dial परभणी या कंपनीमध्ये सेल्स व मार्केटिंग या पदा करिता भरती करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मोहिमे अंतर्गत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.