चंद्रपूर: बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन
पो.डा. जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र मशारकर , चंद्रपूर,: चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. प्रभागातील डॉ. आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या दोन भागातील नागरिकांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांनी सांगितले की, “बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. त्यानुसार 2019 पर्यंत काम पूर्ण करावे लागते होते. मात्र, 2023 हे वर्ष संपत असतानाही अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
कंत्राटदाराकडून कामात लापरवाई केली जात आहे. कामाची गुणवत्ताही चांगली नाही. अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे रस्ते खराब झाले आहेत. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
यासंदर्भात महानगरपालिकेचे शहर अभियंता महेश बारई यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, उपाध्यक्ष सुनील सतभय्या तब्बसुम शेख, सुधीर पाटील अनुप तेलतुंबडे, डॉ. देवेंद्र अहेर, जयदेव देवगडे, अजय बाथव, भिमराज बागेसर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.