छत्रपती शिवाजी पुतळा उभारणी आणि अनावरण आयोजनात घोटाळा; सरकारने उत्तर द्यावे : हरीश चव्हाण
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने महायुतीचा भ्रष्टाचारी कोथळा बाहेर पडला आहे. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही. पण ८ महिन्यांपूर्वी बांधलेला पुतळा कोसळला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २.४० कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं #हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे २.०२ कोटी… वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल.
७८ लाख, ४४ लाख अणि ७९ लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर २०२३ मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेबर २०२३ मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते.
तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं अशी मागणी नाशिक येथील समाजसेवी श्री. हरीश चव्हाण यांनी केली आहे.