पो. डा. वार्ताहर , वाशिम : सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस् एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम यांच्या वतीने आयोजित ६२ व्या सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन २६ जुलै रोजी करण्यात येणार आहे. १४ वर्षाखालील स्पर्धेकरीता मुलांचे जन्म १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर झालेला असावा. २७ जुलै २०२३ रोजी १७ वर्ष वयोगटातील स्पर्धेकरीता मुले व मुलींचे जन्म १ जानेवारी २००७ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. १४ वर्ष मुलांची स्पर्धा २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सुरु होईल. १७ वर्ष मुले,मुलींची स्पर्धा २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे घेण्यात येणार आहे. तरी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांनी आपला प्रवेश अर्ज २५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावा. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.