पो.डा. वार्ताहर, नवी दिल्ली : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सी.ए. परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे मे महिन्यात घेतल्या जाणार आहेत
परंतु त्याच्या तारखा मात्र बदलण्यात आल्या आहेत.
सुधारित वेळापत्रकानुसार,
गट १ ची इंटरमीडिएट अभ्यासक्रमाची परीक्षा ३, ५ आणि ९ मे २०२४ रोजी होणार आहे.
यापूर्वी, ही परीक्षा
३, ५ आणि ७ मे २०२४ रोजी होणार होती.
गट २ साठी, इंटरमिजिएट अभ्यासक्रमाची परीक्षा ११,१५ आणि १७ मे २०२४ रोजी होणार आहे.
यापूर्वी, ही परीक्षा
९, ११ आणि १३ मे २०२४ रोजी नियोजित होती.
अंतिम परीक्षेसाठी, गट १ साठी
२, ४ आणि ८ मे २०२४ या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
गट २ साठी, या परीक्षा
१०, १४ आणि १६ मे
२०२४ रोजी घेण्यात येईल.
निवडणूक आयोगाने एप्रिल जून २०२४ मध्ये १८ व्या लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर परीक्षेच्या वेळापत्रकात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.