पो.डा. वार्ताहर :
मुलुंड (पूर्व) येथे कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे आज मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल त्याशिवाय शामराव पेजे महामंडळाला अधिकचा निधी आणि परळ येथील वास्तूलाही आवश्यक निधी दिला जाईल. याबरोबरच तालुका स्तरावरील कुणबी भवनसाठी सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, खासदार मनोज कोटक आदी उपस्थित होते.