पो.डा. वार्ताहर , वाशिम : सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे हे ६ डिसेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शासकीय वाहनाने मालेगांव(जि.नाशिक) येथून चाळीसगांव-कन्नड मार्गे समृध्दी महामार्ग वेरुळ इंटरचेंज (छत्रपती संभाजीनगर) कडे प्रयाण.सकाळी १०.३० वाजता समृध्दी महामार्ग वेरुळ इंटरचेंज येथे आगमन व समृध्दी महामार्गाची पाहणी करत शासकीय वाहनाने मालेगांव इंटरचेंज (जि. वाशिम) कडे प्रयाण.दुपारी १२.३० वाजता समृध्दी महामार्ग इंटरचेंज (जि. वाशिम) येथे आगमन व समृध्दी महामार्गाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी २ वाजता शासकीय वाहनाने समृध्दी महामार्ग मालेगांव इंटरचेंज (जि. वाशिम) येथून नागपूरकडे प्रयाण करतील.