पो.डा. वार्ताहर , चंद्रपूर : श्री महर्षी सुदर्शन महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त सुदर्शन समाजातर्फे चंद्रपूरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेतर्फे स्थानिक कस्तुरबा चौकात भव्य स्वागत करण्यात आले. श्री महर्षी सुदर्शन महाराज यांचा जयजयकार करणा-या घोषणांनी यावेळी परिसर निनादुन गेला होता. चंद्रपूर भाजप महानगर ब्रिजभूषण पाझारे,राहुल घोटेकर प्रमोद क्षिरसागर,सुर्या खजांची, रेणुका घोडेस्वार, शिला चव्हाण, सचिन कोतपल्लीवार, मनिषा महातव, चॉंद सय्यद,अमोल मत्ते, बळीराम महतव, विक्रम महातव, भारत बिरीया, दिलीप हजारे, आतिश असरेट, शैलेश महातव, अनिल खोटे, त्रिलोक बिरिया, सुनील राठोड, विश्वनाथ महातव, वीरेंद्र राठोड, राज खोडे, राम सावरकर, आतिश हटवाल, रितेश खोटे, युवराज बिरिया,आदी भाजपा पदाधिका-यांसह मोठया संख्येने भाजपा कार्यकर्ते या स्वागताप्रसंगी उपस्थित होते.