पो.डा. वार्ताहर , नागपूर :
नागपूर. श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या विविध सेवाभावी उपक्रमाच्या शृंखलेतील गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचा शुक्रवार 1 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम नगर, पावनभूमी, वर्धा रोड, सोमलवाडा येथे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.
राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे व परिसरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असलेल्या भूमिपूजन समारंभासाठी नागरिकांच्या दुचाकी आणि चार चाकी (टू व्हिलर आणि फोर व्हिलर) वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन जवळील एअरपोर्टच्या जागेवर करण्यात आलेली आहे. नागरिकांनी यासंदर्भात दक्षता घ्यावी व आयोजन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी महापौर श्री संदीप जोशी यांनी केले आहे.