चंद्रपूर दि.3, आजच्या जागतिक सायकल दिन व पर्यावरण दिनानिमित्त प्रदुषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे सायकल रॅलीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले होते.
सदर सायकल रॅलीमध्ये तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत काळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी तसेच जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक विजय अंबारे, अधिक्षक सुरेश शेंडे, स्विय सहायक नरेन्द्र भोवरे, प्रकाश पायतोड व सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच मामला सायकल ग्रुप, आय.एम.ए. सायकल ग्रुप मधील मंगेश गुलवाडे व इतर सदस्य आणि गो ग्रिन सायकल ग्रुप मधील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी श्री. पी. जी. भोसले यांनी जागतीक सायकल दिनानिमित्त सर्वाना सुभेच्छा दिल्या व सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. सदर रॅली जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथुन माहात्मा गांधी चौक मार्गे पुन्हा न्यायालयात येवुन रॅलीचा समारोप झाला. सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी, पोलीस कर्मचारी व अॅड. महेंद्र असरेट यांनी सहकार्य केल्याची माहिती सुमित जोशी यांनी दिली.