जिल्ह्यातील प्रदूषणाचा वाढता आलेख असताना सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होताना दिसत नाही, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला शंखपुष्पी भेट देत स्मरणशक्ती वाढविण्याचा सल्ला दिला.
जिल्ह्यातील चंद्रपूर, घुग्गुस, ताडाळी या प्रदूषित एमआयडीसी मधील रासायनिक, सिमेंट विटा, स्टील, औष्णिक विद्युत केंद्र, ऑईल कंपनी यामुळे गंभीर वायू प्रदूषण होत असून हवेची व पाण्याची गुणवत्ता खराब झालेली आहे यामुळे अनेक स्थानिक नागरिकांना श्वसनाचे, त्वचेचे आजार होत आहे तर काही कामगारांना फुफुसाचे कॅन्सर झाल्याची बाब पुढे आली आहे. ही बाब गंभीर असून रोजगाराचा विचार करताना आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे करीता कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याने. यावर येत्या महिन्याभरात ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसेचे व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, विधी सेल अध्यक्ष मंजू लेडांगे, जनहित सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील गुडे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर मडगूलवार, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे,मनोज तांबेकर, शहरअध्यक्ष युगल ठेंगे मनविसे शहरउपाध्यक्ष सुयोग धनवलकर, पियूष धूप, सचिन बाळस्कर,शारीरिक सेनेचे राकेश बोरीकर, अमित बेले, करण नायर,राज वर्मा, मयूर मदणकर, वर्षा भोमले, चैतन्य सदाफले, कार्तिक खंगार, बाळू शेवते, नितेश शेंडे, विजय तुरक्याल, अक्षय काकडे, अक्षय चौधरी, तुषार येरमे हे उपस्थिती होते.