क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या निषेधार्ह व दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या रविवारी झालेल्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणी अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटविण्यात आल्याच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके महणाल्या
‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे.सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा मी तीव्र निषेध करीत आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे, शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरु आहे.ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.
तरी,सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले तसेच सावरकर जयंतीचा कार्यक्रम महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आला होता.त्या साठी प्रशासनाने सावित्रीबाई फूले व अहिल्यादेवीचे पुतळे त्यांच्या नेहमीच्या जागेवरून हटवून बाजूला ठेवले होते.हे मुख्यमंत्री व उपमूख्यमंत्री यांना कळले नसेल का असा सवाल शिंदे फडणवीस सरकारला केला पुतळे हटवणाऱ्या वर कार्यवाही करण्याची अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली यावेळी उपस्थित महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके माजी नगराध्यक्ष दिपक जयस्वाल यूवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे युवती जिल्हाध्यक्ष पाटील ज्येष्ट नागरिकचे जिल्हाध्यक्ष बहादे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष नितिन पीपलसेंडे सर जिल्हाउपाध्यक्ष आनंद अडबाले जिल्हा सरचिटणीस बब्बूभाई इशा माजी.जि. प सदस्य शरद मानकर माजी. पंचायत समिती सदस्य दिगंबर आमर रहिकवार शुभम, गणेश, राहिकवार दुर्योधन चंद्रपूर तालुका अध्यक्ष वानिता मावलिकर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पूजा सेरकी विधान सभा अध्यक्ष किरण साळवी, शुभांगी साठे जिल्हासंघटिका सरस्वती गावंडे जिल्हासरचिटणीस माया देशभ्रतार जिल्हासचिव निर्मला नरवडे जिल्हा सचिव नंदा शेरकी जिल्हासंघटक सचिव लता जांभूळकर प्रमिला पाठक सोनाली चड्डक्के, लीना वैद्य,रजनी उईके, रेशना मेश्राम,कांताताई कार्यकर्ते महीला उपस्थित होते
[0:48 pm, 02/06/2023] Mau: दोषींवर पोलीस विभागामार्फत कारवाई करणार
– पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि १ (जिमाका):- जिल्ह्यात उमेद अभियानाचे समाधान कामकारक आहे तथापी काही बचत गटांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये जे दोषी आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद ) चा आढावा त्यांनी घेतला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकाही शुभांगी साठे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकल्प संचालिका (DRDA ) नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते. जिल्हयात उमेद अभियानामध्ये किती जण कार्यरत आहेत अशी विचारणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच या सर्वाचे मानधन वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले.
राज्यात सन 2012 मध्ये हे अभियान सूरू करण्यात आले आऊन असून रत्नागिरी जिल्हयात एकूण १५ हजार ७०९ बचत गट कार्यरत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती घाणेकर यांनी दिली. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांच्या प्रमुखांसह जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.