मुंबई – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 जणांनी मुंबईतल्या जे.जे. हॉस्पीटलमधील आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या कारभारावर आक्षेप घेत या 9 जणांनी अधिष्ठाता सापळेंवर गंभीर आरोपही केले आहेत. जे.जे. हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या मागील एका वर्षापासून मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार करत या सर्व 9 वरिष्ठ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले आहेत. यासंदर्भात राजीनामे देणा-या डॉक्टर्सनी एक निवेदनही जारी केले आहे. यात राजीनामा देण्यामागील भुमिका स्पष्ट करत संपूर्ण घटनाक्रमही नमूद केलाय. आणखी वाचा – कंत्राटदाराची कमाल, घडी घालून ठेवता येणारा रस्ता तयार केला पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी अदा केलेले नाही. त्यांना शासकीय निवासस्थान सोडायला सांगण्यात आले आहे. शिवाय 7 लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय, असंही पत्रकात नमूद कऱण्यात आलंय. जे.जे. हॉस्पीटलमधल्या निवासी डॉक्टर्सला आमच्याविरोधात भडकावलं जात असून त्यामागे हॉस्पीटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे असल्याचा गंभीर आरोप डॉ. तात्याराव लहाने यांनी केलाय. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह जे.जे. हॉस्पीटलच्या 9 वरिष्ठ डॉक्टर्सनी राजीनामे दिल्याच्या घटनेबाबत अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली. डॉ. सापळे म्हणाल्या, ” या 9 डॉक्टरांचे राजीनामे अजून मिळालेले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी जास्त बोलणार नसल्याचं डॉ. सापळे यांनी सांगितलं.