धनगर समाज सेवा मंडळ जिल्हा चंद्रपूर पुरस्कृत धनगर जमात युवक युवती मंच चंद्रपूर तर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव चे आयोजन 31 मे रोजी स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, जटपुरा गेट, चंद्रपूर येथे आयोजित केलेले आहे यामध्ये करिअर गायडन्स, व्यवसाय मार्गदर्शन सेमिनार व व्याख्यान तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हे केलेले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनगर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे हे राहणार आहे. प्रमुख व उद्घाटक प्रा. योगिनी देगमवार या राहणार आहेत. तसेच दहावी बारावी पदवीधर युवक युवतींना करिअर गायडन्स व व्यवसाय मार्गदर्शक म्हणून मा. प्राध्यापक नामदेव मोरे सर, समीक्षक करियर गायडन्स तसेच व्यवसाय मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी या विषयाकरिता मा. श्री काशिनाथ राठोड साहेब, प्रकल्प अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर हे राहणार आहे यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हे स्थानिक ठिकाणी केलेले आहेत तसेच या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्हाभरातून विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवतींनी तसेच नागरिकांनी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धनगर जमात सेवा मंडळ चंद्रपूर यांनी केलेले आहे तसेच सहसंयोजक म्हणून राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला मंच, जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर यांनी आवाहन केलेले आहे.