पो. डा. ब्रम्हपुरी वार्ताहर,
दि 24 मे 2023 ला ब्रम्हपुरी येथे ओबीसी च्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत ओबीसी जनजागरण साठी दि 31 जुलै पासून नागपूर येथून निघणाऱ्या मंडल यात्रेची माहिती देण्यात आली. तसेच 2024 हे निवडणूक वर्ष असल्याने ओबीसीच्या शिक्षण, शासन व सत्तेतील सहभागीतेच्या तत्वाचा मूलभूत आधार असलेल्या जातनिहाय जनगणना, नॉन क्रिमि्लेअर रद्द करणे, ओबीसी विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 100% स्कॉलरशिप, बढती मध्ये सेवारत कर्मचाऱ्यांना आरक्षण, ओबीसीचा बकलॉग भरणे, ओबीसीसाठी हॉस्टेल सुरु करणे, ओबीसी शेतकऱ्यांना एससी, एसटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी सुविधा देणे, ई. वरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी राजकीय पक्ष धर्म आणि देवाच्या नावावर ओबीसी ला प्रवृत्त करून धार्मिक उन्माद करणार नाही यासाठी येत्या 26 नोव्हे 2023 ला संविधान दिनी ओबीसी VJ, NT, SBC चा विराट मोर्चा नागपूर येथे आयोजित केल्याची माहिती उपस्थितांना ओबीसी नेते बळीराज धोटे यांनी दिली. बैठकीत तरुण कार्यकर्त्यांसह जेष्ठ मार्गदर्शक भाऊरावजी राऊत, ओबीसी जनगणना समन्वय समितीचे तालुका अध्यक्ष जगदीश पिलारे, सिंदेवाही चे जेष्ठ कार्यकर्ते मनोहरराव पवार, नवनाथ देरकर सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.