पो.डा.वार्ताहर, नाशिक , सिडको : अतिशय लहानपणामध्ये मातृछत्र किंवा पितृछत्र हरपणे म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळात संघर्ष हा अटळच.
परंतु अशा कठीण प्रसंगात आ. सौ. सीमाताई महेश हिरे यांचे कार्यालय दुःखी पीडित कुटुंबीयांसाठी आधार ठरत आहे.
दिनांक 28 जून 2023 रोजी राजरत्ननगर, उत्तमनगर ,सिडको नाशिक येथील स्वर्गीय श्री अभिजीत राजेंद्र सांबरे यांचे निधन झाले.
अशा काळामध्ये नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी सांबरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सांबरे परिवाराचे सांत्वन करताना शासकीय योजनांमधून मयत अभिजीत सांबरे यांच्या परिवारास आवश्यक ती मदत केली जाईल. त्याकरता संबंधितांना मार्गदर्शन केले.
आज श्रीमती प्रभा अभिजीत सांबरे यांनी त्यांचा सात वर्षाचा मुलगा कुमार रुद्र याचे बालसंगोपन योजनेचा प्रस्ताव भाजपा ज्येष्ठ नेते श्री महेश जी हिरे यांच्या हस्ते दाखल केला.