पो.डा. वार्ताहर , ठाणे : देशभरात आज ‘राष्ट्रीय अवयवदान दिन’ साजरा होत आहे, त्यानिमित्ताने ठाण्यात हे उद्यान महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येईल, हे सांगतानाच राज्यातील इतर महापालिका, नगरपरिषद क्षेत्रात असे उद्यान तयार करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
या उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती या साकारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येईल. याच उद्यानात अवयवदान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे.
राज्यातील हे पहिले उद्यान ठाणे शहरातील कै. इंदिरा बाबुराव सरनाईक उद्यान, कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील ६ हजार चौरस मीटरच्या जागेवर तयार करण्यात येणार आहे