शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एकाच छताखाली नागरिकांना लाभ मिळाल्याचे वेगळे समाधान मिळत आहे.
🔰 वरिष्ठांपासून सर्व यासाठी काम करत आहेत. एक समाधान आहे की शासनाने घेतलेल्या निर्णयाचे लाभ प्रत्यक्ष जनता घेऊन जात आहे.
🔰 पुणे जिल्ह्यातल्या या कार्यक्रमाने कोटीच्या कोटी उड्डाण करून विक्रम केला आहे….. आपण २२ लाख ६१ हजार लाभार्थींची नोंद करून सुमारे ३००० कोटी रुपयांचे लाभ वाटत आहोत.
🔰 आतापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांनी शासन आपल्या दारी अभियानाचा लाभ घेतला आहे. लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अधिकारी-कर्मचारी काम करताहेत.
🔰 राज्यभरात विविध योजनांच्या लाभाचा सुमारे ७ ते ८ कोटी जनतेला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
🔰 वर्षभरातील सरकारचे निर्णय पाहिले की आपल्या लक्षात येईल की आमच्या सरकारने सर्वसमावेशक निर्णय घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. या डबल इंजिनच्या सरकारला आता अजितदादा पवार यांची साथ लाभली आहे.
🔰 जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील काम तीन टप्प्यात होईल, येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळतील यासाठी ही कामं करण्यात येणार आहेत.
🔰 शिवाय राज्यातील शक्तीपीठांच्या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा देण्याचं काम हे सरकार करीत आहे.
🔰 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की समाधान वाटतं. टीका करणाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून हे बघायला हवं.
🔰 महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा सर्वांनाच लाभ होणार असून ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. राज्यातील जनतेला शासकीय रुग्णालयांमधून मोफत तपासणी आणि मोफत उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे.
🔰 शेतकरी, महिला बचत गट यांच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
🔰 महिला बचत गटांचे खेळते भांडवल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास, महिलांना प्रवासात निम्मी सवलत, संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ, असे अनेक निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्य माणसांसाठी हे निर्णय घेतले आहेत.
🔰 बळीराजा अडचणीत आला तर त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.
🔰 आम्ही ३५ सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली.
🔰 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्याला दरवर्षी ५० हजार रुपये एकरी शेतकऱ्याला देण्याचा निर्णय घेतला.
🔰 सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १५०० कोटी रुपये तरतूद केली, सुमारे १२ हजार कोटी रुपये विविध आपत्तीत वाटले आहे.
🔰 नमो शेतकरी सन्मान योजनेत केंद्राच्या सहा हजारा बरोबरच राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
🔰 केवळ १ रुपयात पिक विमा योजनेला कधी नव्हे तो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.
🔰 शेतकऱ्यांना तातडीची मदत पाच हजारांवरून दहा हजार रुपये केली आहे, टपरी, दुकानदारांना संकटकाळात मदत केली जात आहे.
🔰 देशात आज आपलं राज्य परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आलं आहे. बंद पडलेल्या योजना आम्ही पुन्हा सुरु केल्या आहेत.
🔰 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालच देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचा शुभारंभ झाला, त्यातील ४४ रेल्वे स्थानके महाराष्ट्रातील आहेत.
🔰 केंद्राकडे पाठपुरावा, विनंती करुन विविध योजना राज्यासाठी मंजूर करवून घेण्यात येत आहे. एकूण दीड लाख कोटी रुपयांची विकास कामे केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यात सुरू आहेत.
🔰 केंद्राने राज्याला अमरावतीमध्ये पीएम-मित्रा मेगा टेक्स्टाईल पार्क दिला. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पाठबळ दिल्यामुळे परदेशी गुंतवणूक येण्यामध्ये महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा १० हजार कोटीपेक्षा अधिक रकमेचा आयकर केंद्राने माफ केला आहे, अशा विविध स्तरावर केंद्राने राज्यासाठी वर्षभरात भरीव मदत केली आहे.
🔰 सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी अशा सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी हे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.