पो.डा. वार्ताहर , औरंगाबाद : महसुल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात महसूल प्रशासनातर्फे युवा संवाद, एक हात मदतीचा असे अभिनव उपक्रम राबवून जनसामान्यांना सेवा देऊन दिलासा देण्यात आला. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डे य यांच्या मार्गदर्शनाखाली या विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हाभरात करण्यात येत आहे.
‘युवा संवाद’ द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिसादेवी मंडळाअंतर्गत सावंगी येथे स्टेपिंग स्टोन या शाळेत युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा याअंतर्गत शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षा व करिअर यासारख्या विषयांवर संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार विजय चव्हाण, स्टेपिंग स्टोन इंग्लिश स्कूलचे संचालक अब्दुल हुसेन, श्रीमती नझीमा यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा संवाद कार्यक्रमासाठी कृष्णा प्रेमभरे मंडळ अधिकारी पिसादेवी, पी. एन. बिरारे तलाठी सावंगी, तलाठी ज्ञानेश्वर सोनवणे, तलाठी पिसादेवी राहुल वंजारी, तलाठी जटवाडा आशिष पुपले, तलाठी पळशी सतीश घुगे गणेश निकम सेतू व्यवस्थापक, अनंत कौडीकर शाळा व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.
निराधारांना मदतीचा हात
महसूल सप्ताह अंतर्गत रोजी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम तहसिल कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने रबिवण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत औरंगाबाद शहर व ग्रामीण भागातील उपस्थित नागरिकांना संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजने बाबत माहिती देण्यात आली.
सहजापूर येथे भारतीय प्रजातीची वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धनाचे महत्व नागरिकांना सांगण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत शहरी भागातील 107 व ग्रामिण भागातील 100 असे एकूण 207 लाभार्थीयांना विविध योजना लाभ मंजुरी आदेशाचे वितरण करण्यात आले. नायब तहसिलदार परेश चौधरी, प्रशांत देवळे, सय्यद इशकोद्दिन, धनंजय साळवे तसेच संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील सर्व कार्यालयीन कर्मचारी व तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे सहजापुर येथे नायब तहसीलदार प्रशांत देवढे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सरपंच जनार्धन बनसोडे, उपसरपंच कैसर इस्माईल शेख, मंडळ अधिकारी श्रीमती अभिलाषा म्हस्के, तलाठी भरत दुतोंडे, सैय्यद कलीम कोंदन,ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पाटील,कृषी सहाय्यक श्रीमती चितळकर, नागमवाड, केंद्र प्रमुख सूर्यवंशी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे पाटोदा ता.जि.औरंगाबाद येथे ‘एक हाथ मदतीचा’ कार्यक्रम घेऊन नागरिकांना सांज गांधी योजना,श्रावणबाळ योजना व अन्य योजनांची माहिती देण्यात आली. योजनेच्या 47 जणांचे प्रकरणे पुर्ण करण्यात आले. तसेच शिधापत्रिकांसाठी अर्ज भरून घेण्यात आले. मंडळ अधिकारी विभाग पंढरपूर, तलाठी सज्जा पंढरपूर, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,सर्व सदस्य पाटोदा, मुख्यध्यापक पाटोदा व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
नेवरगाव येथे आपत्तीर व्यभवस्था पन प्रात्यमक्षिक कार्यक्रम
गंगापुर तालुक्याआतील मौजे नेवरगाव येथे शासनाच्या् महसूल सप्ताहतंर्गत आपत्ती् व्यवस्थापन प्रात्येक्षिक महानगरपालिका अग्निशमन दलाकडुन सादर करण्या त आले. कार्यक्रमात उपजिल्हाआधिकारी अप्पायसाहेब शिंदे यांनी महसूल सप्ताुहाचा उददेश तसेच हया सप्तादहातंर्गत जिल्ह्याभरात राबवित असलेल्याय विविध उपक्रमांची माहिती उपस्थित ग्रामस्थां ना दिली.
महसुल सप्तासहातील विविध उपक्रमाचा लाभ घेण्या चे देखील आवाहन त्यां नी केले मौजे नेवरगाव हे गोदावरी काठी वसलेले गाव असल्यासने गावाला नेहमीच पूरपरिस्थितीला तोंड दयावे लागते त्याआमुळे पुरापासून बचाव कसा करावा याचे प्रात्यवक्षिक मनपा औरंगाबाद चे अग्निशमन दल प्रमूख श्री. मु्ंगसे यांनी उपस्थितांना प्रात्यजक्षिक दाखवले. यात त्यांपनी पूरातील बचाव कार्य , सर्पदंश, रस्ते अपघात इत्याषदी आपत्ती तून बचावासाठी वापरण्यायत येणा-या विविध उपकरणांची माहिती दिली. कार्यक्रमात जिल्हां परिषद प्रथमिक शाळा नेवरगांव येथील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता.
तहसिलदार सतीष सोनी, अपर नायब तहसिलदार खैरनार, तहसिलदार आकाश दहाडदे, मनपा अग्निशमन दल प्रमुख मुंगसे, ग्रा पं नेवरगांवचे सरपंच श्रीमती. सुरेखा चोथे, माजी जि प. सदस्थअ मधूकर वालतुरे, पेशकर श्री दिपक राजपूत, मंडळ अधिकारी, जामगांव श्री आर डी बेडवाल,मंडळ अधिकारी मांजरी , ए पी जोशी, तलाठी श्री. म. एस.पी खिल्लाेरे तलाठी श्री. डी एम नजन दिपक थोरात तसेच नवर गाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते
खुलताबाद- धामणगाव येथे एक हात मदतीचा
मौजे धामणगाव येथे महसुल सप्ताेह तिसरा दिवस साजरा करण्याेत आला. महसूल सप्तािहात ‘एक हात मदतीचा’ आत्मणहत्यालग्रस्तत शेतकरी वारस पत्नीे सरला एकनाथ बोंबले यांना वाटप करण्या त आले. तसेच जात प्रमाणपत्र दाखले विद्यार्थ्यांना वाटप करण्या त आले. शेतकरी यांना ७/१२ व ८ अ उतारा वाटप करण्याचत आले. दुर्गम भाग भेट म्हजणून धामणगांवला भेट देऊन गांवक-यांच्यात समस्यांचे निराकरण केले.
या प्रसंगी नायब तहसिलदार निलम लुनावत महसुल १ खुलताबाद, किशोर वाघ मंडळ अधिकारी विभाग सुलतानपूर,उज्वनला वाघमारे तलाठी,आदमवाड ग्रामसेवक,प्रियंका राठोड कृषीसहायक,सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील आदि उपस्थीउत होते.
गोळेगाव येथे – अटल पेंशन योजना, विविध कृषी योजना, ई पीक पाहणी ,मनरेगा अंतर्गत योजनांच्या लाभासाठी समस्याचे निराकरण
आज गोळेगाव ता. खुलताबाद येथे कार्यक्रम माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी भोसले मॅडम यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. गोळेगाव व आजूबाजूचा 5 गावांचा सहभाग घेऊन एक हात मदतीचा हा कार्यक्रम आयोजित केला गेला. यामधे खालील गोष्टीचा समावेश करण्यात आला होता. गावातील 90 शेतकर्यांाना 7/12 चे वाटप करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती मधील शेतकर्यांणना अनुदान वाटप संबंधी आधार क्रमांक व दुरुस्ती करण्यात आली. महसूल प्रशासन मार्गदर्शन व रस्त्यांचा समस्या समजून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. अटल पेंशन योजना, विविध कृषी योजना, ई पीक पाहणी ,मनरेगा अंतर्गत योजना या विषयांचे समस्याचे निराकरण केले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत दुरुस्ती व इतर समस्याचे निराकरण केले.
पैठण- पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शेतकर्यां चे मत परिवर्तन
उपविभागीय अधिकारी पैठण – फुलंब्री सोहम वायाळ व तहसिलदार पैठण सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन मंडळ येथील शेतकरी खातेदार यांना मोफत सातबारा वाटप, संजय गांधी योजने मधील मंजूर लाभार्थी यांना पुढील कागद पत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. तसेच नवीन लाभार्थी यांच्या फाईल भरून घेण्यात आल्या. पाणंद मुक्त रस्ते करण्याबाबत शेतकऱ्यांना त्याचे महत्व सांगुन पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शेतकर्यांीचे मत परिवर्तन करण्यात आले. उपस्थित शेतकर्यांेना ई-पीक पाहणी बाबत मार्गदर्शन करून ‘माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ योजने बाबत माहिती दिली. यावेळी गरजूंना उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.. सदर कार्यक्रमास बिडकिन मंडळातील सरपंच व ईतर ग्रामस्थ, मंडल अधिकारी बिडकिन तसेच मंडळातील सर्व तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील उपस्थित होते.
कन्नड “एक हात मदतीचा ”
चिकलठाणा ता. कन्नड येथे महसुल सप्ताह निमित्ताने “एक हात मदतीचा” कार्यक्रमात विविध दाखले, 7/12 वाटप, पीक विमा पावती वाटप तसेच ई-पीक पाहणी, ई- हक्क याबाबत जागृती करण्यात आली.
प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार मा. विद्याचरण कडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार श्रीमती मोनाली सोनवणे, मंडळ अधिकारी श्री सतीश भदाणे, तलाठी दीपक एरंडे, मोहिते, सपकाळ, तसेच चिकलठाण सरपंच, ग्राम सेवक,सदस्य ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
महसूल सप्ताह निमित्ताने ‘समता कन्या प्रशाला ,पिशोर’ कन्नड येथे 02 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रम साजरा करण्यात आला.
फुलंब्री – पी.एम.किसान योजनेचा लाभ
पी.एम.किसान योजनेचा तहसील कार्यालयामध्ये कॅम्प आयोजित करण्यात आलेला असून या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांचे गुलाबाचे फुल देऊन तहसीलदार साहेब यांनी त्यांचे स्वागत केले आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध अडचणी निवारण करण्यात आल्या. सकाळपासून 20 शेतकऱ्यांच्या अडचणी निवारण करण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे.
संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री येथे महसुल सप्ताह निम्मित आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत CPR व इतर बाबतीत मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड मॅडम, अप्पर तहसिलदार मोगरकर मॅडम, श्री. म्हस्के जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.
वैजापूर
वैजापुर तालुक्यात महसुल सप्ताह अंतर्गत तहसील कार्यालय तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त दहा कुटुंब व त्यांचे वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये शासनाकडून मदत देण्यात आली. तसेच पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्याकडून वीस गुंठे जमीन प्रदान करण्याचे आदेश देण्यात आले तसेच विविध प्रमाणपत्र अवलंबून प्रमाणपत्र सातबारा इत्यादी वाटप करून शेतकरी बांधवांना मदतीचा एक हात देण्यात आला .
नगरपालिकेच्या म्हसोबा चौक प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला .याप्रसंगीमा.उपविभागीय अधिकारी अरुण जराड सर, श्रीमती महेक स्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर तहसीलदार सुनील सावंत बी. यु. बिघोत मुख्याधिकारी नगरपरिषद वैजापूर, तहसील कार्यालयातील सर्व अहवाल कारकून महसूल सहायक मंडळ अधिकारी तलाठी लोकप्रतिनिधी सरपंच ग्रामसेवक व अनेक विद्यार्थी यांची उपस्थिती होती.