पो.डा.वार्ताहर , नागपूर : महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट ‘महसूल दिन ‘म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. जनतेला अधिक दर्जेदार सेवा देण्याकरिता यावर्षी दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा सत्कार विभागीय आयुक्तक विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते करण्यात आला. स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपजिल्हाधिकारी संवर्गात रामटेक येथील उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) पियुष चिवंडे यांना गौरविण्यात आले. तहसिलदार संवर्गात नागपूर ग्रामीणचे तहसिलदार प्रताप वाघमारे, नायब तहसिलदार संवर्गात काटोल तहसिल कार्यालयातील भागवत पाटील, अव्वल कारकून संवर्गात नागपूर शहर तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून उज्वला घाईत, काटोल तहसिल कार्यालयातील विक्रम कोकणे, महसूल संवर्गात शेख शरीफ अब्दुल गफ्फार, मंडळ अधिकारी संवर्गात ओमप्रकाश नेहरकर आणि हिंगणा तहसील कार्यालयातील अजयसिंग व्यास, तलाठी संवर्गात राखी पोटकर आणि प्रेरणा भगत,पोलिस पाटील संवर्गात मनोज नेव्हुले, शिपाई संवर्गात राजेंद्र ढोरे, कोतवाल संवर्गात विलास नरताम आणि प्रशांत कासे यांना सन्मानित करण्यात आले. माहिती व तंत्रज्ञान विभागात जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सी. एस.ठवळे, अतिरिक जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी क्षमा बोरोले आणि प्रकल्प व्यवस्थापक (महाआयटी) जिल्हाधिकारी कार्यालय उमेश घुगुसकर यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नवनियुक्त ५ कोतवालांना नियुक्ती आदेशही यावेळी देण्यात आले.