पो.डा. वार्ताहर वाशिम : महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना तसेच लाभार्थ्यांना व्हावी. तसेच महसूल सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती नागरीकांना होवून त्यांनी या सप्ताहात सहभागी व्हावे. यासाठी महसूल दिनाचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या महसूल रथाला जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी आज 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या शुभारंभ प्रसंगी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम, अपुर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी मोहन जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री ललीत वऱ्हाडे, सखाराम मुळे, वैशाली देवकर, तहसिलदार सर्वश्री गजेंद्र मालठाणे, दीपक पुंडे, प्रतिक्षा तेजनकर, कुणाल झाल्टे, राजेश वजीरे, रवि राठोड यांचेसह महसूल व अन्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महसूल रथावर महसूल सप्ताहादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली आहे. हा रथ 1 ऑगस्ट रोजी मंगरुळपीर तालुका, 2 ऑगस्ट-कारंजा तालुका,3 ऑगस्ट-मानोरा तालुका, 4 ऑगस्ट- रिसोड तालुका, 5 ऑगस्ट-मालेगाव तालुका, व 6 ऑगस्ट -वाशिम तालुका मार्गक्रमण करुन नागरींकाना महसूल विभागाच्या योजनांची माहिती देखील देणार आहे.