पो.डा. वार्ताहर : कोरपणा येथे साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिवशी बावणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपंचायत च्या पुढाकारानेआठवडी बाजार चौकाला डॉ.अण्णाभाऊ साठे चौक असे नाव देऊन नामकरण करण्यात आले व बावणे साहेब यांनी स्वतःच्या लेआउट मधील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी मातंग समाजांना स्मारकासाठी 3000 स्क्वेअर फुट जागा देऊन महामानवांना प्रेरित असा आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न माननीय बावणे साहेब यांच्या हातून झाले त्यासाठी त्यांना जिवती तालुका व कोरपणा तालुका येथील मातंग समाजाच्या वतीने त्यांच्या वाढदिवशी त्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला व त्यांना भावी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या अण्णाभाऊंच्या जयंती दिवशी त्यांचा जन्मदिवस असल्याने या जन्मदिवसाच्या गिफ्ट म्हणून दोन्ही ठिकाणी आज अण्णाभाऊ साठे चौक व स्मारकासाठी ची जागा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत कोरपणा नगरपंचायत च्या नगराध्यक्ष बावने काकू माजी सभापती रणदिवे साहेब उपाध्यक्ष व नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ नेते विजय बावणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या मोठ्या दिलदार मनाच्या अशा कार्याला सर्व समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या