पो.डा. वार्ताहर : पुणे | टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज पंतप्रधान Narendra Modi यांना प्रदान करण्यात आला. मुख्य विश्वस्त दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधानांना शाल, विशेष सन्मानचिन्ह, मानपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.