पोलीस डायरी प्रतिनिधी : इस्लाम धर्मात मूर्तिपूजा मान्य नाही त्यामुळे मूर्तिपूजा करणाऱ्या लोकांच्या मुर्ती तोडून टाका ही शिकवण अंगिकारून प्रचंड नासधूस करण्यात आली. मुर्तीभंजक असे बिरूद यांच्या सरदारांनी मोठ्या अभिमानाने मिरवले.
एक एक मुर्ती कोरायला काही महिने लागत असतील आणि यांची वावटळ आली की अक्षरशः काही सेकंदात त्या कलाकाराचे कष्ट पाण्यात गेलेले पाहताना जीव तुटतो.
दुसऱ्या धर्माच्या देवतांबद्दल आदर नसणे हे समजू शकतो परंतु एखाद्या धर्माला कलेचे वावडे कसे काय असू शकते? मुघल काळात कलेवर बंदी आणल्याची सुद्धा उदाहरणे आपल्याला आढळून येतात.
काशी विश्वेश्वर आमचा आहे हे सांगायला आज survey करायला लागतो. कोर्टात सिद्ध करावे लागते की हे मंदिर होते. असेच राहिले तर या मुर्ती सुद्धा बनवणाऱ्या हातानेच तोडल्या असे सुद्धा आपल्याकडे म्हणले जाईल आणि आपल्याला तसे नाही ते सिद्ध करावे लागेल.
फोटो – पांडेश्वर व लोणी भापकर येथील मंदिरे, श्री. आशुतोष आकेरकर