पोलीस डायरी प्रतिनिधी: मोहनदास करमचंद गांधी हे मुस्लीम पुत्रच असल्याचा पुनरुच्चार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अकोल्यात बोलताना केला. यासंदर्भातला उल्लेख असलेल्या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन त्यांनी व्याख्यानात केले. करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे मोहनदास हे पुत्र आहेत. त्या पत्नीला मुस्लीम जमीनदाराने पळवून नेले होते. लव्ह जिहाद आणि त्यात काही फरक नाही, अशी वादग्रस्त टीका भिडे यांनी केली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अकोला विभागाद्वारे रविवारी सायंकाळी ओम मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी मुस्लीम धर्माविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली. हिंदुस्थानावर खूप आक्रमणे झाली आहेत. अनेक टोळ्यांनी ५०० वर्षे गोंधळ घातला. जगात ५२ मुस्लीम राष्ट्रांपैकी ३९ देशांनी हिंदुस्तानावर आक्रमण केले आहे. ते स्वतःच्या जन्मदात्रीलादेखील आई मानत नाहीत, अशी वादग्रस्त टीका भिडे यांनी केली. ‘हिंदू देहाने जिवंत आहेत, पण मनाने मेलेले आहेत, हेच खरे दुर्दैव आहे. हिंदूंनी स्वदेशी स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. स्वदेशी बाणा आत्मसात करण्याची गरज खरी गरज आहे. विदेशी उत्पादनांचे बाजारपेठेवर वर्चस्व आहे. ते देश लुटत आहेत. इंग्रज व्यापार करण्याच्या दृष्टीने येऊन योजनापूर्वक त्यांनी देशावर कब्जा मिळवला. १७५ वर्षे इंग्रजांनी देशाचा अभ्यास केला होता. स्वदेशी बाणा स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्याला देशाचा टोकाचा अभिमान असल्याशिवाय हे घडणार नाही. हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्वाचे कण कमी आहेत,’ असेही भिडे म्हणाले.
चुकीच्या नीतीमुळे भारत-चीन युद्ध घडले. ५९ हजार सैनिक मारले गेले. या युद्धाला ६१ वर्षे होत आहेत. दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणूक होते. १२ लोकसभा निवडणुकांमध्ये चीनने घेतलेली जमीन वापस काढून घेण्याचा मुद्दा उचलावा, असे कुणालाही वाटले नाही, अशी टीका भिडे यांनी केली. मॉ जिजाऊ यांनी १४ वर्षे शिवबाला सर्वांगीण संस्कार दिले. दादाजी कोंडदेव युद्धनीतीचे धडे दिले. शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्य अडीचपट वाढवले. त्यांचा आदर्श ठेवून हिंदूंनी एकत्रित होऊन राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.