पो. डा. वार्ताहर , परभणी : जिल्ह्यातील सर्व खासगी शयनकक्ष असलेल्या बसधारकांनी त्यांची वाहने निशुल्क पडताळणीसाठी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, असोला येथे आणून तपासून घ्यावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी दिल्या आहेत.
मागील काही दिवसात खासगी बसचे अपघात घडले असून, या पार्श्वभूमीवर परभणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून बसची तपासणी, कागदपत्र पडताळणी केली जात आहे. सोबतच चालकांचीही तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील या बसेसची पडताळणी करण्यासाठी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत वाहन असोला येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुनर्रतपासणीसाठी घेऊन यावे, तपासणीनंतर मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. ही तपासणी पूर्णत: निशुल्क असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.