जिथे शक्य आहे तिथे रस्ता दुरुस्ती करून अतिरिक्त मार्गिका सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी दिल्या. ठाणे-नाशिक मार्गाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
ठाण्याकडून भिवंडीकडे जाताना मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी मार्गावरील सर्व खड्डे बुजवून हा मार्ग गर्दीच्या वेळी वापरण्याच्या सूचना दिल्या. रांजनोली पुलाखालून अवजड वाहनांना गाड्या फिरवून घेता याव्यात यासाठी अतिरिक्त जागा तयार करण्याचे निर्देश दिले.
कोणते काम कुणाच्या अखत्यारित आहे याचा विचार न करता जनतेला होणारा त्रास तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशाही सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ ठरवून द्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी वाहतूक पोलीस विभागाला दिल्या.