पो. डा. वार्ताहर : जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी येथे 2024-25 सत्रासाठी इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
उमेदवार जिल्ह्यातील रहिवासी असावा. शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता पाचवीमध्ये शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त शाळेत शिकत असावा.ज्या उमेदवारांनी शासकीय किंवा शासकीय मान्यताप्राप्त विद्यालयातून तिसरी व चैाथीचे शिक्षण घेतले असावे. उमेदवाराचा जन्म 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखांसह).अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10ऑगस्ट असून परीक्षेची तारीख 20 जानेवारी 2024 अशी आहे.
उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरीच्या प्राचार्यांनी केले आहे.