“कर्करोग निदान ‘अद्यावत वाहनाचे ब्रह्मपुरीत लोकार्पण
पो. डा. जिल्हा प्रतिनिधी , जितेंद्र मशारकर चंद्रपूर : राजकारण म्हणजे जनतेची सेवा करण्याकरिता मिळालेली जबाबदारीची संधी होय. एक सच्चा जनप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना निवडून देणाऱ्या मतदारांचे ऋण फेडण्याकरिता क्षेत्र विकासासह प्रत्येक मूलभूत समस्यासह आरोग्य रक्षणाची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधीवर असते. राजकारणात संधी साधूंनी स्वार्थ साधले मात्र आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून मतदारसंघातील हजारोंच्यावर नागरिकांना कर्करोग या महाभयंकर प्राणघातक रोगांपासून लढण्यास सहकार्य केले. ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. हे माझे अहोभाग्यच. मानवरुपी देवताची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून मानवसेवेतच खऱ्या ईश्वर प्राप्तीचा आनंद मिळतो असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कॅन्सर निदान अद्यावत वाहनाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.