काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि युवा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.
पो. डा. वार्ताहर , गोंडपीपरी (ता. प्र) :– बंगारम्मा देवी सभागृह, भंगाराम तळोधी येथे काँग्रेस च्या वतीने गोंडपीपरी तालुक्यातील इयत्ता १० वी, १२ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच जेईई, निट परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमानंतर काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी मार्ग दर्शन करतांना आ. धोटे म्हणाले की, सध्याचे स्पर्धेचे युग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला अधिक कार्यक्षम ठेवून आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत घवघवीत यश संपादन करावे. संपादित ज्ञान आणि यशाचा उपयोग आपल्या वैयक्तिक उन्नतीसाठी तसेच सामाज व राष्ट्रीय उन्नतीसाठी करावे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते, उद्घाटक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सह उद्घाटक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे होते, प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपीपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, कृ. उ. बा. स. संचालक अशोक रेचनकार, प्रा. शुंभू येलेकर, माजी प स सदस्य श्रीनीवास कंदनुरीवार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली दिवसे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष बंडावार, नामदेव सांगळे यासह विलास माडूरवार, नगरसेवक सुरेश तिलंकर, सचिन चिंतावार, गजानन पेंडीलवार, सुदर्शन कारपेनवार, अजय माडूरवार, सहदेव रेड्डी, विनोद नागापूरे, बालाजी चणकापूरे, संजय झाडे, अनंता कुंदजयार, नारायण वाग्दकर, साईनाथ बोरकुटे, विजय एकोनकार, अनुराग फुलझले, माधुरी येलेकर, सुधाकर निकोडे, विपीन पेद्दुलवार, शुभम पिंपळकर, समीर येगेवार, बजरंगीलाल, अनिकेत दुर्गे, स्वप्नील पोगुलवार, अभिषेक पुपलवार, मंगल पेद्दुलवार दिवाकर पाटेवार, प्रचिन बुरीवार यासह अन्य सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.