पो. डा. वार्ताहर , चंद्रपूर, दि. 11 : जिल्हा परिषदेतंर्गत सन 2021 या वर्षात रिक्त झालेल्या विविध पदसंख्येच्या 20 टक्के पदे सन 2022 मध्ये पात्र अनुकंपाधारकांच्या नियुक्तीने भरण्यात आली. त्यापैकी उर्वरीत 17 पदांचा अनुशेष शिल्लक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशानुसार सदर अनुशेष सन 2023 च्या सुरुवातीस पात्र अनुकंपा धारकांच्या नियुक्तीने प्रथम भरण्यात आला. सन 2022 या वर्षात रिक्त झालेल्या विविध पदांच्या संख्येच्या 20 टक्के प्रमाणे एकूण 90 पदे पात्र अनुकंपाधारकांना त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व प्रवर्गनिहाय पात्रतेनुसार जिल्हा परीषदेच्या सरळसेवेच्या विविध पदांवर नियुक्त्या देवून भरण्यात आली.
सन 2023 या वर्षात एकुण 107 अनुकंपाधारकांना शासनाच्या अनुकंपाविषयक धोरणानुसार व नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशान्वये जिल्हा परिषदेच्या विविध पदांवर पारदर्शक रित्या नियुक्त्या देवून त्यांना समुपदेशनाने रिक्त ठिकाणांवर पदस्थापित करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेतंर्गत दिवगंत झालेल्या विविध संवर्गातील 107 कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना सामाजिक जीवन सन्मानाने जगण्यास मोठा आधार व दिलासा मिळालेला असल्याने सर्वस्तरावरुन समाधान व्यक्त केल्या जात आहे.
अनुकंपाधारकांच्या मोठ्या प्रमाणात नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी पार पाडली