पो. डा. वार्ताहर , वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालय,वाशिम येथे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त वतीने जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे होते. प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवाणी, मुख्य लोक अभिरक्षक अॅड.परमेश्वर शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डि. बी. खेळकर,पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे,महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा संरक्षण अधिकारी महादेव जऊळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.काळबांडे यांनी उपस्थितांना जागतिक लोकसंख्या दिनाबाबत मार्गदर्शन केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. टेकवाणी यांनी महिलांना आपल्या अधिकाराबाबतची माहिती घेवुन काही अडचणी आल्यास किंवा कायदेविषयक मार्गदर्शन हवे असल्यास महिलांनी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.स्वाती इथापे यांनी महिलांबद्दल पोलीसांचे अधिकार व कर्तव्ये तर महादेव जऊळकर यांनी महिलांचे अधिकाराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य लोक अभिरक्षक अॅड. परमेश्वर शेळके यांनी केले. संचालन राहुल कसादे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. बालाजी हरण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी स्वयंसेवक सुशिल भिगजियाणी, गोतीराम खडसे, शाहीर उत्तम इंगोले, मनिषा दाभाडे, उषा वानखेडे व शितल बनसोड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हयातील विधी स्वयंसेवक व जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.