पो. डा. वार्ताहर : 7 आँगस्त 2023 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 8 वे राष्ट्रीय अधिवेशन तिरुपती एस.व्ही. युनिव्हर्सिटी येथे आयोजीत करण्यात आले आहे. या अधिवेशनाची तयारी करण्यासाठी आढावा बैठक धनवटे नॅशनल कॉलेज नागपुर येथे घेण्यात आली, या वेळी मंचावर डॉ बबनराव तायवाडे , डॉ अशोक जीवतोडे समन्वयक , सचिन राजूरकर महासचिव, प्रा शेषराव येलेकर उपाध्यक्ष , गुनेश्वर आरिकर कोषाध्यक्ष, दिनेश चोखारे कार्याध्यक्ष महाराष्ट्र, वूंदा ठाकरे महिला शहर अध्यक्ष उपस्थित होते या वेळी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग , आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावा. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे. ओबीसी , विजा भज व विशेष मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह त्वरित सुरु करण्यात यावे, एस.सी., एसटी विद्यार्थ्यांना लागू असलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना किंवा डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सर्व ओबीसी , विजा , भज व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावी. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची राज्यामध्ये अंमलबजावणी कार्यक्रमांतर्गत ओबीसींचा विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग समावेश करण्यात यावा. ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तिरुपती येथे होणाऱ्या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ बबनराव तायवाडे यांनी केले.
बैठकीला प्रकाश साबळे, कल्पना मानकर,शकील पटेल ऋषभ राऊत, राजू चौधरी, अनंत बरसागडे,पराग वानखेडे, शुभम वाघमारे, रुचिका डफ , विनोद हजारे, निलेश खोडे, मुकेश पुंडके, शिंदे, अनिल ठाकरे, मांगे सर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी , महाराष्ट्र कार्यकारिणी , विदर्भ कार्यकारिणी , सर्व जिल्हाध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित होते. संचालन शरदराव वानखेडे यांनी तर परमेश्वर राऊत यांनी केले