पो. डा. वार्ताहर, परभणी : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेराजगार युवक-युवतींसाठी या अभियानांतर्गत खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दि. 14 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा श्री मंगल कार्यालय, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ स्टेशन रोड, परभणी येथे आयोजीत करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास 30 नामांकित मोठे उद्योजक/कंपन्या सहभाग नोंदविणार आहेत. जिल्ह्यातील बेराजगार युवक-युवतीनां या मेळाव्याव्दारे नौकरी प्राप्त करून घेऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्याची एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे.
या महारोजगार मेळाव्यामध्ये नोकरीसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. www.mahaswyam.gov.in. महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर जाऊन आपल्या नावांची नोंदणी करावी यासाठी सर्वप्रथम वेबपोर्टलवर (म्हणजेच नोकरी शोधणारा) या पर्यायावर क्लिक करावे, तदनंतर या वेबसाईटवर आपली बेरोजगार म्हणून नोंदणी असेल तर लॉगइन बॉक्समध्ये युजर आयडी व पासवर्ड चा वापर करून लॉग इन करावे. जर पूर्वी नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी या पर्यायावर क्लिक करून आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरल्यास मोबाईल क्रमांक व ईमेल आयडीवर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल तदनंतर युजर आयडी व पासवर्डचा वापर लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे. प्रोफाईल दिसु लागल्यावर प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायावर क्लिक करावे. परभणी जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. यानंतर आपल्या शासन आपल्या दारी या अभियानाअंतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सव निमित पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा ऑफलाईन क्र. 1 मेळावा दिसू लागेल त्यातील ॲक्शन या पर्यायावरील View Details या बटणावर क्लिक केल्यावर मेळाव्यात नोकरीसाठी उपलब्ध असेलेली पदे दिसतील. list of Vacancy या बटणावर क्लिक करून शैक्षणिक पात्रतेनुसार Apply करावे तदनंतर आपल्याला एक संदेश दिसेल. सदर संदेश काळजीपूर्वक वाचून Ok बटणावर क्लिक करावे. आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला आहे अशा प्रकार संदेश दिसू लागेल. ऑनलाईन Apply केल्याबाबतच्या व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन दि. 14 जुलै रोजी सकाळी 9 वा. श्री मंगल कार्यालय, लक्ष्मी नारायण मार्ग, स्टेशन रोड, परभणी मुलाखतीचे पत्र व मुलाखतीस हजर राहणाऱ्या सर्व बेरोजगारांना चहापान व बिस्कीटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ज्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य होणार नाही त्यांची नांव नोंदणी महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 च्या दरम्यान करण्यात येईल.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सदर मेळाव्यास सहभाग नोंदवावा. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452-220074 वर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.