पो. डा. वार्ताहर, धुळे : शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांच्या दारी पोहोचत असल्याने ‘शासन आपल्या दारी’ अभियानास राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहेत. या अभियानात धुळे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
केंद्र सरकारच्या मदतीने आणि सहकार्याने राज्य शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ योजनेस आणि धुळे महापालिकेच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून धुळे – नरडाणा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.