पो. डा. वार्ताहर ,वाशिम : आदिवासी मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतीगृहातील रिक्त जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.वसतीगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.इयत्ता ११ वी, पदविका, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे.
ऑनलाईन अर्ज www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
जिल्हयात आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्रमांक १, चिखली रोड,राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाजुला वाशिम. आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्रमांक 1, चिखली रोड,राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाजुला वाशिम. आदिवासी मुलांचे वसतीगृह क्रमांक 2, माउली कॉम्प्लेक्स, महालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ वाशिम. आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्रमांक 2, द्वारा अरुण सरनाईक यांची इमारत, जुने कोषागार कार्यालयाजवळ वाशिम येथे इयत्ता 10 वी ते 12 वी व पुढील अभ्यासक्रमासाठी व आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह,शहानूर दर्ग्याजवळ,मंगरुळपीर येथे इयत्ता 7 वी,10 वी व 12 वी आणि पुढील अभ्यासक्रमाकरीता अर्ज मागविण्यात आले आहे.
वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी/ विद्यार्थीनी हे अनुसूचित जमातीचे असावे.विद्यार्थ्यांकडे व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.अव्यावसायीक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. चालु आर्थिक वर्षातील तहसिलदार यांचा मुळ उत्पन्नाचा दाखला,विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. खाते आधार क्रमांकाशी व मोबाईलशी लिंक संलग्न असावे. बँक खाते प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावेत. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली संस्था मान्यता प्राप्त महाविद्यालय/ संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेतलेला नसावा. विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याने संस्थेच्या वसतीगृहामध्ये प्रवेश घेतला नसल्याचे प्रमाणपत्र. प्रवेश घेतलेल्या शाळा/ महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटूंब प्रमुखाचे हमीपत्र, शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला, मार्कशीट, विद्यार्थ्यांचे फोटो, आधारकार्ड, आई/वडील नोकरीवर नसल्याचे ग्रामसेवक/ तलाठी यांचे प्रमाणपत्र, ऑनलाईन भरलेला अर्ज ऑफलाईन काढून त्याची प्रत व सोबत ऑनलाईन सादर केलेले आवश्यक सर्व कागदपत्रांसह संबंधित वसतीगृहातील गृहपाल यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील असे अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.