पो. डा. जळगाव : शासनामार्फत नैसर्गिक आपत्तीत जिवीतहानी झाल्यास महसूल विभागामार्फत संबंधित लार्भाथ्याच्या कुटूंबास चार लाख रुपयांची मदत देण्यात येते.
4 जुन, 2023 रोजी पारोळा तालुक्यातील मोजे दगडी सबगव्हाण येथील रहिवाशी शेतमजूर कै.सुनिल आबाजी भिल हे दुस-या शेतक-याच्या शेतात मजुरीचे काम करीत असतांना दुपारी आलेल्या पावसात वीज पडून त्यांचा मुत्यु झाला. सदर घटनेची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर तात्काळ अपादग्रस्त कुटुंबाची भेट घेवून घटनेची माहिती घेण्यात आली. व घटनेचा पंचनामा तयार करुन ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी यांचेशी संपर्क साधुन पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त करुन घेण्यात आला.
घटनेच्या दुस-याच दिवशी सर्व शासकीय कागपत्रांची पुर्तता केल्यानंतर पारोळा तहसिलदार डॉ उल्हास देवरे यांनी 6 जुन, 2023 रोजी सकाळी आपले महसुल कर्मचारी यांचेसोबत पिडीत कुटुंब व ग्रामस्थांची गावी जावुन भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी कुटुंबियांना शासनामार्फत देय असलेल्या मदतीचे तात्काळ वितरण करण्यात येईल असे आश्वस्त केले होते. त्यानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची पडताळणी व खातरजमा केल्यानंतर सांयकाळी पिडीत कुटुंबियांना आमदार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 48 तासाचे आत 4 लाखाचा धनादेश वितरीत करण्यात आला. आणि खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी चा प्रत्यय आणून दिला.
यावेळी सदर कुटुंबास अतिरिक्त मदत म्हणुन संजय गांधी निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना यांचे लाभ लवकर अदा करणेबाबत कार्यवाहीचे आश्वासनही देण्यात आले. याप्रंसगी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ यांनी उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी व कर्तव्याच्या भावनेतून ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाने 48 तासात मदत केल्याने प्रशासनाचे आभार मानले.