पो. डा. जळगाव : शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र या संस्थेत सन २०२३- २४ या वर्षाकरीता वय वर्षे ६ ते १५ या वयोगटातील मुकबधिर, अंध, अस्थिव्यंग मुलांना प्रवेशासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज ३० जून, २०२३ पर्यंत कार्यालयाकडून पुरविण्ययात येतील. अर्ज संपूर्ण प्रक्रीया पुर्ण करून १५ जुलै, २०२३ पर्यंत स्वीकारले जातील. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारास जुलै महिन्यात मुलाखतीस बोलविण्यात येईल. मुलाखत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करण्यात येईल.
या संस्थेत शासनामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण, पांघरूण, क्रमीक पुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, शालेय व कला शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. प्रवेशासाठी उमेदवार हा अंध, कर्णबधीर किंवा अस्थिव्यंग या पैकी एकाच प्रकारचे अपंगत्व असणारा आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या उमेदवाराने अर्ज करू नये. उमेदवारास कोणतीहा संसर्गजन्य आजार असू नये.
अर्ज पाठवितांना अर्जासोबत अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र (ऑनलाईन), जन्म दाखला, उत्पन्न दाखला, मुलांचे अपंगत्व दिसेल असे चार फोटो व झेरॉक्स प्रती पाठवाव्यात व मुलाखतीच्या वेळी मुळ प्रमाणपत्र घेऊन उपस्थित रहावे.
तीनही अपंगत्वाचे प्रवर्गानुसार त्या विभागातील तज्ञांचा वैद्यकीय दाखला मुकबधिरासाठी श्रवणालेख आवश्यक आहे. अस्थिव्यंग मुलांना शारिरीक पुन:वर्सन हा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी प्रवेश दिला जाईल व त्या कालावधीत त्यांना शालेय शिक्षण दिले जाईल, शारिरीक पुनर्वसन झाल्यानंतर त्यांचे पुढील वर्षी संस्थेतून नाव कमी करण्यात येईल. संस्थेत प्रवेश दिल्यानंतर संस्थेच्या सर्व नियमांचे उमेदवार व पालकांनी कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. सर्व बाबीची पुर्तता केलेले अर्जच फक्त विचारात घेतले जातील अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. परीपूर्ण अर्ज व अधिक माहितीसाठी शासकीय बहुउदेशीय दिव्यांग समिश्र केंद्र, मेहरूण रोड, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अधिक्षक, शासकीय बहुउद्देशिय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.