केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांची पत्रकार परिषदेत घोषणा , पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सतत पाठपुराव्याचे फलित
पो. डा. वार्ताहर चंद्रपूर, : “चंद्रपूर जिल्ह्यातील श्रमिकांसाठी सुसज्ज कामगार (ईएसआयसी) रुग्णालय व्हावं हे स्वप्न साकार होतंय; केंद्रीय कामगार कल्याण, वन आणि पर्यावरण मंत्री श्री. भूपेंद्रजी यादव यांनी आज़ यांसंदर्भात पत्रकार परिषदेत घोषणा करुन “गरीबों कें सम्मान में, भाजपा सरकार मैदान में” हे घोषवाक्य सत्यात उतरवून दाखविले असून जिल्ह्यातील हजारो श्रमिक बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून भूपेंद्रजी यादव आणि विश्वगौरव मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर हे फलित मिळाल्याबाबत राज्याचे वन, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय व जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आहे.
केंद्रीय वन, पर्यावरण आणि कामगार मंत्री श्री भूपेंद्र यादव हे नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळासंदर्भात भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित “मोदी@9” अभियानासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आहेत; केंद्र सरकारच्या कामांची उपलब्धी पत्रकारांशी संवाद साधताना ना. भूपेंद्र यादव सांगत असतानाच जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर ते बोलत होते. चंद्रपूर हा जिल्हा कोळसा खाण, वीज निर्मिती प्रकल्प, सिमेंट उत्पादन प्रकल्प तसेच विविध औद्योगिक प्रकल्प असलेला जिल्हा असून हजारो श्रमिक येथे काम करतात; त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यल्प दरात योग्य आरोग्य सुविधा प्राप्त व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. चंद्रपूर येथे 100 खाटांचे ईएसआयसी रुग्णालय तयार करण्याची घोषणा ना. मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी 30 जुलै रोजी घुग्गुस आणि पोंभूर्णा येथे आयोजित महाआरोग्य शिबिरातील सेवव्रती डॉक्टर्सच्या सत्कार समारंभात 5 ऑगस्ट रोजी केली होती.
वर्तमान युगात आरोग्यविषयक तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत; वेगवेगळे गंभीर आजार बहुतांश कुटुंबांपर्यंत पोहोचले आहेत; आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक उपाय करण्यासाठी शहरातील सुसज्ज रुग्णालयात जावू शकतात; परंतु गरीब कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची यांसंदर्भात होणारी परवड हृदय पिळवटून टाकणारी असते. तरीही शक्य तेवढ्या लोकांना सहकार्य करण्याचा आपण प्रयत्न करतो;चंद्रपूर शहरात या कामगारांसाठी सर्व सोयी सुविधांसह चांगले कामगार रुग्णालय अर्थात ईएसआयसी रुग्णालय व्हावे अशी माझी मनापासून इच्छा होती, ती आज़ केंद्रीय मंत्री श्रीं भूपेंद्र यादव यांनी पूर्ण केली त्यामुळे मनापासून मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया ना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.