पो.डा. चंद्रपूर :
गावच्या लोकांना हे माहिती नसते की खासदारकीची कामे काय असतात? आणि यामुळे गावच्या लोकांची दिशाभूल करणे काही राजकीय मंडळींना सोपे जाते. बऱ्याच वेळा जाणूनबुजून काही गावकऱ्यांना खासदार आपल्या गावात आल्यावर चुकीचे प्रश्न विचारायला सांगतात, म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर गावकऱ्यांना काही लोक सांगतात की, अमुक खासदार निवडून दिल्या पासून मागील ५ वर्षे आमच्या गावात आलाच नाही, का आला नाही ते विचार? आमच्या गावासाठी तू काय केलेस? भोळ्या गावकऱ्यांना हे प्रश्न बरोबर वाटतात आणि गावात आलेल्या खासदारला कोंडीस पकडण्याचे प्रयत्न केले जातात.
खासदार हा मुळात गावची कामे करण्यासाठी निवडून दिला जात नाही. हे आधी नीट समजून घ्या. खासदार आणि त्याचा पक्ष जर सत्तेत असेल तर त्यांना तुम्ही खलील प्रश्न विचारू शकता-
# मागील ५ वर्षात देशाच्या सुरक्षेसाठी काय केले?
# मागील ५ वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत काय वाढ झाली?
# मागील ५ वर्षात विदेशी गुंतवणूक देशात वाढली का?
# मागील ५ वर्षात देशासाठी चांगले कायदे कानून बनवलेत का?
# मागील ५ वर्षात नेशनल हायवे मोठ्या प्रमाणात बनवलेत का?
# देशाची पाणी समस्या सोडण्यासाठी देश पातळीवर काय उपाययोजना केल्यात?
# मागील ५ वर्षात जगात देशाचा मानसन्मान वाढवला का?
# मागील ५ वर्षात देशात किती गोरगरिबांना घरे दिलीत?
#मागील ५ वर्षात देशाची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या पक्षाने काय उपाययोजना केल्यात?
हे असले प्रश्न तुम्ही तुमच्या निवडून दिलेल्या खासदारला विचारायची असतात आणि जर का वरील प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर आपण गावकऱ्यांनी याच खासदारला आणि याच्या पक्षाला पुन्हा निवडून दिले पाहिजे, कारण देश चालवायचा आहे गाव नाही. गावची कामे करण्यासाठी सरपंच, प.स.सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार हे लोक असतात, खासदार देश पातळीवर काम करत असतो. चुकीचे प्रश्न विचारून आपण आपलं नुकसान करून घेऊ नका. देश टिकला पाहिजे तरच आपले गाव टिकेल, देशाच्या सुरक्षेसाठी खासदार निवडून द्यायचा असतो हे लक्षात ठेवा.