पो. डा. प्रतिनिधी.
दिल्लीचे मुख्यमंत्री मा. श्री. अरविंद केजरीवाल यांनी आज मा. खा. शरदचंद्र पवार साहेब यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पंजाबचे मुखमंत्री श्री. भगवंत मान, आम आदमी पक्षाचे इतर नेते सुद्धा उपस्थित होते.
राजधानी दिल्लीचे प्रशासकीय अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या हातात दिले होते. केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला फाटा फोडला आहे. एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. केंद्र सरकारच्या या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत एकत्र येण्याच्या दृष्टीने आज चर्चा झाली.