पो. डा. वार्ताहर , जालना :- जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप येथील अश्विनी दशरथ सौदागर वय 16 वर्षे असलेली मुलगी हरवली आहे. मुलीची उंची अंदाजे 5 फुट असून रंग सावळा, चेहरा उभा तसेच केस काळे, पोशाख पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व लाल रंगाची ओढणी, पायात प्लास्टीकचा बुट, शिक्षण दहावी असून तिला भाषा मराठी येते. या वर्णनाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन घेवून गेल्याची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तरी या वर्णनाची मुलगी कोणास आढळून आल्यास पोलीस ठाणे भोकरदन येथे पोलिस उप निरीक्षक विजय आहेर (मो.8087507511) आणि पोलिस ठाणे भोकरदन दुरध्वनी क्र. 02458-244210 (मो. 8459610489) असा असून हरवलेल्या मुलीच्या संबंधित माहिती असल्यास पोलिस विभागास भ्रमणध्वनीवर किंवा दुरध्वनी क्रमांकाद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे, भोकरदन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.