पो. डा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करून चांगले पद देतो असे सांगून पंधरा हजाराची मागणी केल्या प्रकरणी तिघांनी केला प्रवीण दिवेकर या तरुणाचा खून. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयितांना अटक केली आहे. संशयितामध्ये तुषार पवार, चेतन देहाडे आणि एक अल्पवयीन बालकाचा यात समावेश आहे.
प्रत्यक्ष घटना अशी :
घटना उपनगर येथील आहे. मयत हा महिनापूर्वीच नाशिक मध्ये आला होता, मूळचा मुंबई राहणार असून, त्यांचा आपसात २०१२ पासून परिचय होता, मयत आणि संशयित हे मिळून घरात पार्टी करत होते, त्यावेळी मनसे पक्षात प्रवेश देतो असे सांगून मयताने पंधरा हजाराची मागणी केली होती, त्यातच आपसात वाद झाल्याने सांशयितांनी मिळून प्रवीण दिवेकर याचा चाकू आणि बियर बाटलीने मारून खून केला. सदरील प्रकरणात गुन्हे शाखा युनिट एक व दोन तपास करीत आहे. सदरील गुन्ह्याबद्दल गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तांत्रिक बाबी आणि सी सी टी व्ही फुटेज च्या माध्यमातून संशयितांचा शोध घेतला. आणि प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आली.
गुन्ह्याच्या तपासाबद्दल पोलीस उपयुक्त श्री. प्रशांत बच्छाव यांनी सर्व माहिती दिली.